
खानापूर शहरातील शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक लक्ष्मी मंदिर खानापूर येथे पंडित ओगले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली व निवडणुकीची आचारसंहिता लागू असल्याने शिवजयंती उत्सव मिरवणूक 22 एप्रिल 2023 ऐवजी 21 मे रोजी मोठ्या प्रमाणात करण्याचे ठरविण्यात आले,
राज्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकल्याने राज्यात आचार संहिता लागू झाली असून त्यामुळे अनेक गोष्टींना निर्बंध घालण्यात आले आहेत, याचाच भाग म्हणून पोलीस प्रशासनाने धार्मिक मिरवणुका व इतर गोष्टीवर निर्बंध घातल्याने प्रति वर्षी अक्षय तृतीया दिवशी शिवजयंती व बसव जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जात होती त्याच्यावर सुद्धा आचार संहिता असल्याने निर्बंध घातल्याने पोलीस प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी शिवजयंती आचारसंहिता 15 मे ला संपल्यानंतर 21 मे रोजी मोठ्या प्रमाणात साजरी करण्याचे ठरविण्यात आले त्या दिवशी सायंकाळी ठीक सहा वाजता राजा श्री शिवछत्रपती चौक येथून चित्ररथ मिरवणुकीला प्रारंभ होऊन खानापूर शहरातील अनेक भागातून फिरणार असल्याने सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून मिरवणुकीला शोभा आणावीत असे आव्हान खानापूर शहरातील शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या वतीने युवा नेते पंडित ओगले यांनी केले आहे

यावेळी गुरव गल्ली रवळनाथ शिवजयंती उत्सव मंडळाचे गुंडू तोपिनकट्टी अप्पू यरमाळकर, राजू गुरव, श्रीकांत मोटर, सोमनाथ गुरव, तसेच निंगापूर गल्ली शिवजयंती उत्सव मंडळाचे राहुल सावंत व कार्यकर्ते तसेच महालक्ष्मी शिवजयंती उत्सव मंडळाचे पंडित ओगले, किरण तुडवेकर संदीप अंगडी, निलेश कुंभार, पिंटू यळूरकर, प्रकाश देशपांडे, दिनकर मरगाळे, सुहास पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते
