
भारतीय जनता पार्टीची उमेदवारी माजी आमदार अरविंद पाटील यांना डावलून विठ्ठलराव हलगेकर यांना देण्यात आल्याने भाजपाच्या नाराज कार्यकर्त्यांनी पदाधिकारीनी व अरविंद पाटील समर्थकांनी आक्रोश व्यक्त करत आज दि 12 एप्रिल 2023 रोजी शनया हॉल खानापूर येथे बैठक बोलावून माजी आमदार अरविंद पाटील पुढे जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी आम्ही सहमत राहणार असून त्यांच्या पाठीशी शेवटपर्यंत खंबीरपणे उभा राहणार असल्याची ग्वाही माजी आमदार अरविंद पाटील समर्थकांनी व भाजपा कार्यकर्त्यांनी शनया हॉल या ठिकाणी बोलाविलेल्या बैठकीत दिली,

यावेळी तालुक्याच्या वेगवेगळ्या भागातून व कानाकोपऱ्यातून जवळपास 2000 पेक्षा जास्त जेष्ठ नागरिक व भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यानी गर्दी केली होती, यावेळी माजी आमदार अरविंद पाटील, भाजपाचे जेष्ठ नेते बाबुराव देसाई, मंजुळा कापसे, महांतेश सानीकोप, महेश बीडकर, ता पं सदस्य संजय हलगेकर, व आदिजन व्यासपीठावर उपस्थित होते,
यावेळी माजी आमदार अरविंद पाटील कार्यकर्त्यांना उद्देशून बोलताना म्हणाले की मला विचार करण्यासाठी चार दिवस वेळ द्या मी वरिष्ठाशी बोलून विचारविनिमय करून माझा निर्णय तुम्हाला मी कळवतो तोपर्यंत चार दिवस भाजपा कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी व समर्थकांनी गोंधळ न करता शांत बसवावेत अशी विनंती केली, तालूक्यातून आलेल्या अनेक नेतेमंडळींची यावेळी अरविंद पाटील यांच्या समर्थनार्थ भाषणे झाली,
या वेळी कार्यकर्त्यांनी आपापल्या घरातून भाकरी बांधुन घेऊन प्रचार करणार असल्याची ग्वाही दिली तसेच प्रचाराचा संपुर्ण खर्च देखील सर्व कार्यकर्त्यांनी पट्टी काढून करणार असल्याचे सांगितले,
यावेळी जांबोटी, नीलावडे, बैलूर, पारीश्वाड, बीडी, ईटगी, लोंढा, गुंजी हलशी, भुरूणकी, कक्केरी चापगाव कारलगा व तालूक्यातील वेगवेगळ्या भागातून आलेल्या नागरीकांनी गर्दी केली होती,
