
अंजेनय नगर बेळगाव येथील मुलाने आपल्या डॉक्टर असलेल्या जन्मदात्या पित्याच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून डोकीत पहारीने हल्ला करून त्यांचा खून केला होता त्या केसचा निकाल आज लागून मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली
याबाबत अधिक माहिती अशी की आपला मुलगा आपल्यासारखाच डॉक्टर व्हावा यासाठी वडिलांनी भरपूर प्रयत्न केले होते मात्र मुलगा डॉक्टर तर झालाच नाही उलट वडिलांकडे नेहमीच पैशांची मागणी करून भांडण काढणे पैसे दिले नाहीत तर मारबडव करणे धक्काबुक्की करणे असे प्रकार करत एक दिवशी त्या मुलाने वडिलांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून पहारीने हल्ला करून खून केला या खून प्रकरणी मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी मुलाला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे
रवी उर्फ रविराज उमाकांत दंडवत (वय 40) अंजेनय नगर सेक्टर 9 बेळगाव असे जन्मठेपेची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून त्याने आपले वडील डॉक्टर उमाकांत शिवलिंगय्या दंडावतीमठ (वय 68 ) अंजेनय नगर सेक्टर 9 यांचा गुरुवार दिनांक 1 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांच्या डोक्यात पहार घालून खून केला होता याप्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
याप्रकरणी रविराज याला माळमारुती पोलिसांनी अटक केली होती तत्कालीन पोलीस निरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर यांनी त्याच्यावर गुन्हा नोंदविला होता मयत डॉक्टर उमाकांत यांची मुलगी डॉ रश्मी विशाल हलगती यांनी आपला भाऊ रवी उर्फ रविराज याच्यावर माळ मारुती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती, सरकारी वकील म्हणून श्री आर एन चाटे यांनी काम पाहिले व आरोपीला शिक्षा होण्यासाठी विषेश प्रयत्न केले,
