
खानापूर दि 14 डिसेंबर
आज सकाळी 8 वाजता खानापूर खानापूर शहराचे गटारीचे पाणी वाहून जाणारे मलप्रभा नदीवरील चेंबर बंद झाल्यानें संपुर्ण घाण पाणी मलप्रभा नदीवरील घाटावरून जात असल्याने नदीला स्नान करण्यासाठी आलेला युवक वर्ग, भावीक, व कपडे धुण्यासाठी आलेल्या महिलांना याचा मनस्ताप झाल्याने त्यांनी नगर पंचायतीच्या नावाने बोटे मोडली व लाखोल्या वाहिल्या
नदिवर स्नानासाठी आलेले सामाजिक युवा कार्यकर्ते राहुल सावंत व विनोद गुरव यांनी नगर पंचायतीला फोनवरून कल्पना दिल्याने नगर पंचायतीचे अधिकारी प्रेमानंद नाईक तातडीने त्या ठिकाणी आपले स्वच्छता कर्मचारी घेऊन दाखल झाले व कचरा अडकून बंद असलेले चेंबर स्वच्छ केले, काही दिवसांपूर्वी “आपलं खानापूर” मध्ये बातमी आली होती खानापूर चे ड्रेनेजचे पाणी मलप्रभा नदीत सोडण्यात आल्याने कुपटगिरी, जळगे, व पुढील आदि गावांतील नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे म्हणून त्याची दखल जिल्हाधिकारी नी घेऊन POLUTION विभागाला कळवून विभागाचे अधिकारी जगदिश यांना पाठविले होते त्यावेळी जगदिश यांनी संपुर्ण नदीची पहाणी करून नगर पंचायतीच्या अधिकार्यांची खरडपट्टी केली होती त्यावेळी “आपल खानापूर” चे संपादक दिनकर मरगाळे तेथे उपस्थित होते त्यावेळी तेथे उपस्थित असलेले नगरपंचायतीचे मुख्याधिकारी बाबासाहेब माने यांनी सांगितले की नदीत मीसळनारे घाण पाणी एका जागेला अडवून ते पाणी स्वच्छ करून आजुबाजूच्या शेतकर्यांना शेतीसाठी देण्याची योजना मंजु झाली असून लवकरच त्याची सुरुवात करण्यात येईल असे सांगितले परंतु अजून ही कामाला सुरूवात नाही, त्यात माने यांची बदली झाल्याने नगर पंचायतीला आर के वटारी म्हणून नवीन मुख्याधिकारी आले आहेत
दुपारी खानापूर तालुका ग्राम पंचायत संघटनेचे पदाधिकारीनी हि याची दखल घेतली असून प्रत्यक्ष ठिकाणी येवुन पहाणी करून गेले असुन वरती तक्रार करणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर व उदय भोसले यांनी सांगितले आहे,
येवढे होवुन हि नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, स्थायी कमिटी चेअरमन व कोणीही नगरसेवक त्या ठिकाणी फिरकले नाहित व याची साधी दखल हि घेतले नाहीत,नगरसेवकानी याची दखल घेऊन नदीत मिसळणारे घाण पाणी आडवुन पाणी स्वच्छ करून ते पाणी शेतकऱ्यांना देण्याची योजना मंजूर झाली आहे त्या योजनेचा पाठपुरावा करून लवकरात लवकर कामाला सुरवात करण्याची मागणी नागरिक व भावीक करत आहेत,
