
राज्यसभा खासदार इराना कडाडी यांनी मंगळवारी संसदेच्या अधिवेशनात बेळगाव ते हैदराबाद आणि मुंबई रेल्वे सेवा सुरू करण्याची मागणी केली आहे याप्रसंगी विशेष उल्लेख करून हा मुद्दा उपस्थित करताना ते म्हणाले की बेळगाव जिल्हा हा ऐतिहासिक, औधोगिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या म्हत्वाचा जिल्हा असून, शैक्षणिक पर्यटन व्यवसाय आणि औद्योगिक कारणांसाठी हजारो प्रवासी दररोज मुंबई आणि हैदराबादला जात असतात,
पण सध्या नागरिक महामार्गावरून प्रवास करत आहेत त्यामध्ये त्यांचा बराच वेळ जात असून तसेच सध्या बेळगावहून मुंबई हैदराबाद शहरासाठी थेट रेल्वे नाही आणि नागरिकांना सणासुदीच्या वेळी बस ने प्रवास करण्यासाठी दुप्पट किंवा तिप्पट भाडे मोजावे लागत आहे त्यामुळे या दोन्ही शहरा दरम्यान दैनंदिन रेल्वे सेवा सुरू करावीत अशी मागणी गेल्या अनेक वर्षापासून जनतेतून होत आहे असे त्यांनी सांगितले पुढे म्हणाले की मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो की रेल्वे मंत्रालयाने यावर तात्काळ विचार करावा आणि बेळगाव मुंबई हैदराबाद सारख्या महत्त्वाच्या शहरांना जोडण्यासाठी रेल्वे सेवा सुरू करावीत ज्यामुळे रेल्वेचा महसूल वाढण्यासाठी ही मदत होईल
