
खानापूर : खानापूर तालुक्यात निवडणुकीचे जोराचे वारे वाहत असून आज पासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून अनेक राजकीय पक्षांनी आपापले उमेदवार जाहीर केले असून काही पक्षात बंडखोरीचे सुद्धा संकेत मिळत आहेत आज गुरुवार दिनांक 13 एप्रिल 2023 रोजी काँग्रेस पक्षाचे युवा नेते इरफान तालीकोटी यांनी स्टेशन रोड येथे आपल्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उदघाटन केले यावेळी त्यानी पत्रकार परिषद सुद्धा घेतली,
यावेळी बोलताना ते म्हणाले की काँग्रेस पक्षात मी उमेदवारीसाठी अर्ज दाखल केला होता, पण वसुलीबाजीमुळे मला उमेदवारी नाकारण्यात येऊन विद्यमान आमदारांनाच पुन्हा उमेदवारी कॉंग्रेस पक्षाने जाहीर केली आहे, त्यामुळे माझ्या समर्थकांच्या व कार्यकर्त्यांच्या व ज्येष्ठ नेत्यांच्या आग्रहाखातर मी काँग्रेस पक्षाचा बंडखोर उमेदवार म्हणून येत्या 20 एप्रिल 2023 पर्यंत तारीख जाहीर करून उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले,

यावेळी ज्येष्ठ कार्यकर्ते यल्लाप्पा गुपीत, निवृत्त पीडीओ एम ए इनामदार, मुगुट्ससाब दोडमनी अब्दुल रशीद खानापूरी, नारायण मासेकर, बाबू पटेल, संतोष मणेरीकर, अब्दुल रौप सय्यद, रशीद खानापुरी, बाबाजी देसाई, इलियास करजगी, राज शेखर हिंडलगी, कोमल बडसद, संजू हचमडी, व कार्यकर्ते उपस्थित होते,

