
कुप्पटगिरी (ता. खानापूर) येथील म. ए. समितीचे ज्येष्ठ नेते व सेवानिवृत्त मुख्याध्यापक संभाजीराव परशराम पाटील (87) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांनी गोव्यात 36 वर्षे सरकारी मराठी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून सेवा बजावली. या काळात पणजी प्राथमिक शिक्षक सोसायटीचे अध्यक्षपद भूषविले. मुख्याध्यापक पदावरून ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतर दै. पुढारीचे पत्रकार म्हणून त्यांनी दहा वर्षे काम केले. खानापूर तालुका म. ए. समितीचे सरचिटणीस म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. खानापूर कृषी पत्तीन संघाचे संस्थापक संचालक होते. उद्या शुक्रवारी सकाळी 10 वा. अंत्यविधी होणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, सून, भाऊ, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
