
हिंदु धर्माच्या प्रसारासाठी व हिंदु धर्म वाढविण्यासाठी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांनी खानापूर येथील इस्कॉन मंदिर हरे राम हरे कृष्ण मंदिरच्या धर्म प्रसार कार्याला हातभार लावण्यासाठी धर्म प्रसार कार्यात आपले हि थोडे योगदान रहावेत या हेतूने त्यांनी इस्कॉन भक्तमंडळी कडून भगवत गीतेची पुस्तके स्वखर्चाने घेतली असुन
त्याच्या विनामूल्य वितरणाची सुरूवात हरेकृष्ण भक्तमंडळींच्या प्रमुख उपस्थित झाली असून तालुक्यातील नागरिकांना ते विनामूल्य वितरण करत आहेत, प्रमोद कोचेरी यांनी धर्म प्रसार कार्यात भाग घेतल्याने इस्कॉन भक्तमंडळी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे,
