
कर्नाटक राज्य ॲमेचुअल ॲथलेटिक्स असोसिएशन च्या वतीने रविवार दि 25.12.2022 रोजी तुमकूर येथे क्रॉस कंट्री स्पर्धा संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये खुला गटातून 10 किलोमीटर रनिंग स्पर्धेमध्ये कुमार वैभव मारुती पाटील रा बिदरभावी तालुका खानापूर याने भाग घेऊन तृतीय क्रमांक मिळविला त्याबद्दल त्याचे अभिनंदन होत आहे, या स्पर्धेत प्रथम क्रमांक नवीन कुमार (धारवाड) याने 36.03 मिनिटात अंतर पार केले तर द्वितीय क्रमांक रोहित कुमार (बेंगलोर) 36.37 मिनिटात तर तृतीय क्रमांक वैभव पाटील 36.50 मिनिटात वरील अंतर पार केले
या सर्वांची अखिल भारतीय राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झालेली असून या स्पर्धा 8 जानेवारी 2023 गोहाटी आसाम राज्यामध्ये होत आहेत,
कुमार वैभव पाटील याचे शिक्षण प्राथमिक मराठी शाळा बिदरभावी येथे तर माध्यमिक शिक्षण महालक्ष्मी हायस्कूल तोपिनकटी येथे झाले असून आता बी कॉम महाविद्यालयीन दुसऱ्या वर्षात बेंगलोर येथील अल अमीन कॉलेज या ठिकाणी शिक्षण घेत आहे,
वैभव हा बेंगलोर येथील कंटिरीवा स्टेडियम बेंगलोर या ठिकाणी धावण्याचा सराव करत असून
आज त्याला अवल श्रीयन असोसिएशन कोच व श्री एल जी कोलेकर सर गर्लगुंजी यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे, त्याला त्याचे शिक्षक असलेले वडील श्री मारुती पाटील व आई तसेच परीवाराकडून प्रोत्साहन मिळत आहे,
