
बेळगाव जिल्ह्या खानापूर तालुक्यातील भुरूनकी ग्राम पंचायती व्याप्तीमधील सुरापूर गावातील शिवराय यल्लप्पा आयेटी या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे.विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या या शेतकऱ्याने विविध बँका आणि सोसायटीकडून कर्ज घेतले होते . केव्हीजी बँक लिंगणमठ शाखेतून 13 लाख 60000 रुपये , कृषी पतीन सहकारी संस्था भुरुणकी मधून , 2 लाख आणि ICICI बँक खानापुर शाखेतून 7 लाख, आणि अॅक्सिस बँक शाखा हुबळी, एसबीआय शाखा कित्तूर 5 लाख असे एकूण 32 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते .

त्यांनी कष्टाने पिकवलेल्या पिकांना योग्य भाव मिळाला नाही, पिके नीट आली नाहीत, मुलांची लग्ने व इतर कौटुंबिक समस्यांनी ह्या शेतकऱ्याला ग्रासले होते . कर्जफेड करण्यास अपयशी ठरल्याने शेतात जाऊन विष प्राशन करून आत्महत्या केली . त्यांच्या पश्चात पत्नी , दोन मुले आणि दोन मुली आहेत . याप्रकरणी नंदगड पोलिस ठाण्यात प्रकरण दाखल करण्यात आले आहे.शासनाने तात्काळ जागे होऊन विष प्राशन करून आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबाला भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
(प्रतिनिधी तानाजी गोरल)
