
पारिशवाड क्रॉस खानापूर येथे गेल्या चार दिवसापासून एक निराधार वृद्ध महिला एका जागेला बसून होती आजूबाजूला फिरून त्याच ठिकाणी परत येवून बसत होती हे सर्वांच्या लक्षात आले पण त्या महिलेची विचारपूस कोणीही करण्यास तयार नव्हते

शेवटी युवा कार्यकर्ते दिगंबर वागळेकर मंजुनाथ हंपन्नावर, शिवा नाईक,सुफियान यांनी तिचे नाव विचारले असता तिने आपले नाव अंबव्वा करगावी असून गोकाक तालुक्यातील करडीगुड्डी गावची रहिवासी असल्याचे सांगून घरच्या लोकांच्या बरोबर भांडण झाल्याने आपण घर सोडून आल्याचे तिने सांगितले असता सदर युवा कार्यकर्त्यांनी तिला शिंदोळी तालुका खानापूर येथील माऊली वृद्धाश्रमात घेऊन गेले व वृद्धाश्रमाचे प्रमुख गजानन घाडी यांच्याकडे वृद्धाश्रमात त्यांची व्यवस्था करण्याची विनंती केली असता अमोल घाडी यांनी त्यांना आपल्या वृद्धाश्रमात दाखल करून घेतल्याने त्यांची सोय झाली आहे,

युवा कार्यकर्त्यांनी माणुसकीचे दर्शन दाखवून त्या वृद्धेची विचार पूस करून तीची सोय केल्याबद्दल सदर युवकांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे,
