
बेळगाव – शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना 7 फेब्रुवारी रोजी बेळगाव न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.बेळगावमध्ये 30 मार्च 2018 रोजी प्रशोभक भाषण केल्याप्रकरणी न्यायालयाने त्यांना आज हजर राहण्याचे समन्स बजावले होते. मात्र, संजय राऊत आज व्यक्तिगत कारणामुळे हजर झाले नाहीत.व्यक्तिगत कारणामुळे आज उपस्थित राहू शकत नसल्याचे संजय राऊत यांनी आपल्या वकिलांमार्फत बेळगाव न्यायालयाला सांगितले.
याप्रकरणी आज झालेल्या सुनावणीदरम्यान राऊत यांच्या वकिलांनी संजय राऊत यांना हजर राहण्यासाठी पुढील तारीख देण्याची विनंती केली होती. त्यानुसार, न्यायालयाने 7 फेब्रुवारी ही तारीख दिली आहे.
