
खानापूर : कोल्हापूर येथे दि 20 फेब्रुवारी 2023 ते 26 फेब्रुवारी 2023 कणेरी मठात सुमंगलम पंचमहाभूत लोक उत्सवाला 35 लाख लोकांची उपस्थिती राहणार असल्याची माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर कर्नाटक प्रांत संचालक राघवेंद्रजी कागवाड यांनी लक्ष्मी मंदिर खानापूर येथे बोलाविलेल्या संघ परिवाराच्या बैठकीत सांगितले,
पुढे बोलताना ते म्हणाले की या लोकोत्सवात प्रदर्शन, परिवर्तन, व परिषद असा कार्यक्रम असुन या लोकोत्सवात देशातील वेगवेगळ्या ठिकाणाहून अनेक प्रकारच्या माती आणण्यात येणार असुन मातीचे वैशिष्ट्य, गुणधर्म, याबद्दल माहिती देण्यात येणार असून प्रदुषणला पाण्याचा अती दुरूपयोग जबाबदार असून कृष्णा नदीच्या तीरावरील शेतकऱ्यांनी जमीनीला पाण्याचा 24 तास अती वापर केल्याने जमीनीवर शेवाळाची निर्मिती झाल्यानें सर्व जमीनी नापीक बनल्या आहेत त्यासाठी पाण्याचा कसा वापर करण्यात यावा याबाबत माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले, तसेच लोकोत्सवात सात दिवसात एकदिवस नागरिकांना, एक दिवस महिलांना, एक दिवस विद्यार्थ्यांना असे वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना मार्गदर्शन करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनी येताना प्रत्येकी 1 कीलो खराब टाकाऊ प्लास्टिक घेऊन येण्याचे त्यांनी आवाहन केले असून सदर प्लास्टिक प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या विविध प्रकारच्या लहानातील लहान मशीन पासुन सर्वात मोठ्या मशीनमध्ये टाकुन त्यापासून वेगवेगळे प्रोडक्ट कसे बनवावेत याची माहिती देण्यात येणार आहे, तसेच या लोकोत्सवात 50 पेक्षा जास्त देशांचें राजदूत,1200 सायंटिस्ट, 1200 योगी, स्वामी, साधुसंत व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे राष्ट्रीय पदाधिकारी स्वयंसेवक, राजकीय नेते मंडळी उपस्थित राहणार आसल्याचे सांगुन सात दिवसांत साधारण 35 लाख लोक उपस्थित रहाणार सांगितले, व या सर्वांच्या भोजनासाठी 20 लाख भाकरी किंवा चपाती लागणार असुन प्रत्येक दिवशी एका तालुक्यातून 20 हजार घरातून प्रत्येकी 20 चपाती, कींवा भाकऱ्या गोळा करण्यात येणार असून ती जबाबदारी निपाणी, बेळगाव, रायबाग, अथणी, चिकोडी, आदि तालूक्याना देण्यात येणार आहे,
खानापूर तालुक्यातील कार्यकर्त्यांना तेथील वेगवेगळी कामे वाटण्यात येणार असुन स्वच्छतेपासुन सर्व व्यवस्था स्वयंसेवक म्हणून कार्य करायचे असून मिळेल ती जबाबदारी पार पाडावी लागणार असून तालुक्यातून 500 पेक्षा जास्त कार्यकर्त्यानी तंबूत वस्ती रहावुन त्या ठिकाणी मिळेल ते कार्य करायची जबाबदारी त्यांनी दिली,
सदर कार्यक्रमात अद्भूत अशी गो शाळेची निर्मिती करण्यात आली असून यात वेगवेगळ्या प्रकारच्या देशी गायीचे प्रदर्शन तसेच मांजर, गाढव, असे सात प्रकारचे प्राणी, शेती अवजारे व वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तूंचे प्रदर्शन मांडण्यात येणार आहे, हा लोकोत्सव मणुष्याच्या फायद्यासाठी, स्वार्थासाठी, कल्याणासाठी असून खानापूर नागरिकांनी मोठ्या संख्येने या लोकोत्सवात भाग घेवुन या लोकोत्सवाचा लाभ घ्यावात असे आवाहन उतर कर्नाटक प्रांत संचालक राघवेंद्र कागवाड यांनी सांगितले आहे,
कार्यक्रमाच्या सुरूवातीला त्यांनी ॐकार शब्दाबद्दल माहिती दिली आकार, ऊकार, मकार, या शब्दांतून ॐकाराची निर्मिती झाली असून आपण नियमित जप केल्याने आपल्याला प्राण वायु चांगला मिळतो व आपल्या आरोग्याचा सुध्दा व्यायाम होतो, बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते,
