
खानापूर : खानापूर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नवीन लॉकर चे उदघाटन बँकेचे जेष्ठ संचालक रवींद्र गणपतराव देसाई यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जेष्ठ संचालक डॉक्टर सी जी पाटील व बँकेचे चेअरमन अमृत शेलार व संचालक तसेच बँकेचा कर्मचारी वर्ग उपस्थित होता,

यावेळी सुरूवातीला सर्वांचे स्वागत बँकेचे जनरल मॅनेजर नंदकुमार खटोरे यांनी केले बँकेचे ज्येष्ठ संचालक रवींद्र देसाई यांनी प्रास्ताविक भाषण केले यानंतर बँकेच्या प्रगती बदल आणि बँकेतर्फे ग्राहकांना कोणत्या सुविधा पुरविणार याबाबत बँकेचे चेअरमन अमृत शेलार, संचालक विजय गुरव डॉक्टर सी जी पाटील एडवोकेट केशव कळेकर बँकेचे सभासद रवी काटगी यांची भाषणे झाली सर्वांचे आभार जेष्ठ संचालक डॉक्टर सी जी पाटील यांनी मानले यावेळी कॅनरा बँकेचे डीजेएम पी ठाकूर नाईक व खानापूर कॅनरा बँकेच्या मॅनेजर शिल्पा एम यांचे स्वागत करण्यात आले, यावेळी उपस्थित पत्रकार व आदींचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी बँकेच्या व्हाईस चेअरमन अंजलीताई कोडोली संचालिका अंजलीताई गुरव संचालक शिवाजीराव पाटील संचालक शामसुंदर घाडी, मारुती खानापुरी, व बँकेचे सभासद व कर्मचारी उपस्थित होते


