
खानापूर : लक्ष्मी मंदिर खानापूर येथे खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेची बैठक संघटनेचे संस्थापक दिलीपराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली, यात नविन कार्यकारीणी निवड करण्यात आली,

कार्यकारिणीमध्ये कुस्तीगीर संघटनेच्या अध्यक्षपदी तानाजी कदम तर कार्याध्यक्षपदी श्री सुरेश कृष्णाजी पाटील, यांची निवड करण्यात आली तसेच स्वागत अध्यक्षपदी श्री मोईद्दीन गावणगीरी, सेक्रेटरीपदी श्री रमेश पाटील, खजिनदार पदी श्री विठ्ठल पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली, निवडीनंतर नवीन पदाधिकाऱ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यानंतर श्री दिलीपराव पवार, श्री सुरेश पाटील, श्री तानाजी कदम, श्री राजाराम गुरव, श्री रमेश पाटील, श्री आबासाहेब दळवी, श्री यशवंत बिर्जे, श्री प्रविण सुळकर,श्री किरण यळुरकर,आदींची भाषणे झाली येत्या आठ दिवसांमध्ये नवीन पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येवुन लवकरच खानापूर शहरात भव्य कुस्ती आखाडा भरविण्याचे ठरविण्यात आले यावेळी श्री देवाप्पान्ना गुरव, श्री नारायण घाडी, श्री प्रविण सुळकर, श्री रामचंद्र खांबले, श्री आप्पाना डेळेकर, श्री राजू चिखलकर, श्री राहुल सावंत, श्री अप्पय्या गुरव, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते,
