
आज खानापूर शिवस्मारक येथे मध्यवर्ती समितीच्या वतीने दोन्ही समितीची बैठक बोलावण्यात आली होती त्यात विचार वीनीमय होवुन दोन्ही समितीची एकी करण्यात आली असुन दोन्ही समितीचे प्रत्येकी चार चार सदस्य एकुण आठ सदस्याची नेमणुक करण्यात आली असुन गोपाळराव देसाई अध्यक्ष असलेल्या समीतीचे गोपाळराव देसाई, राजु पाटील, धनंजय देसाई, किशोर हेब्बाळकर,असे चार सदस्य तर माजी आमदार दिगंबरराव पाटील अध्यक्ष असलेल्या समीतीचे प्रकाश चव्हाण, यशवंत बिर्जे, रमेश धबाले, हणमंत मेलगे, असे चार सदस्य एकुण दोन्ही समीतीचे आठ सदस्य नेमण्यात आले असुन हे सर्व जन तालुक्यातील प्रत्येक मराठी गावात जावुन प्रत्येक गावातील एक सदस्य या प्रमाणे सदस्य नेमणूक करणार असुन त्यानंतर या महिन्याच्या अखेरीस त्या सर्वांची बैठक बोलावून कार्यकारीणी बनवण्यात येणार आहे, आज झालेल्या बैठकीसाठी मध्यवर्ती समितीच्या वतीने प्रकाश मरगाळे, राजाभाऊ पाटील, एम जी पाटील, विकास कलघटगी, आदि नेते मंडळी उपस्थित होते
