
अयोध्येतील श्रीराम मंदिरात बसवली जाणारी घंटा तयार झाली आहे. तामिळनाडूत बनवण्यात आलेली ही एक महान वस्तु आहे.

सर्वात मोठी अशी ६ʼ × ५ʼ आकाराची सुमारे २१०० किलो वजनाची अष्टधातूंपासून बनवलेली ही एकजिनसी एक ओतीव वस्तु आहे. अष्टधातू असे : सोने चांदी तांबे जस्त
शिसे कथिल लोह आणि पारा यापासून बनवण्यात आली आहे
तामिळनाडूतील तुतिकोरीनजवळ असलेल्या एरळ या गावातील रामकृष्ण नाडर भांड्याच्या दुकानातून ही घंटा अयोध्येतील श्रीराम मंदिराकडे जाणार आहे.
या घंटेचा नाद ऐकण्यासारखा आहे. तो १५ किलोमीटरपर्यंत ऐकू जातो.
