
Sanjay Raut Granted Bail Money Laundering Case: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी (Patrachawal Scam) खासदार संजय राऊतांना (Sanjay Raut) कोर्टाने मोठा दिलासा आहे. 2 लाखांच्या रोख रकमेवर जामीन मंजूर करण्यात आला. जामिनाला स्थगिती देण्याची ईडीने (ED) मागणी केली होती. पण ही मागणीही कोर्टाने फेटाळली. ईडीनं जामिनाच्या निर्णयाला विरोध केला होता. तसंच हायकोर्टात याचिका दाखल करेपर्यंत जामिनाला स्थगिती द्यावी अशी मागणी ईडीनं पीएमएलए कोर्टाला केली होती. पण ही मागणी फेटाळल्याने संजय राऊत यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, संजय राऊत यांच्या जामीनाविरोधात ईडी हायकोर्टात (High Court) जाणार आहे.त्याआधी पीएमएलए कोर्टानं त्यांना दोन लाख रुपयांच्या रोख रकमेवर जामीन मंजूर केला. पत्रावाला चाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. मात्र त्यांचा अनेकदा जामीन नामंजूर केला होता. तब्बल 100 दिवसांनंतर त्यांना जामीन मंजूर झाल्यामुळे त्यांचा जेलमधून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचं दिसतंय. संजय राऊत यांच्यासह प्रवीण राऊत यांनाही जामीन देण्यात आलाय. संजय राऊतांना ३१ जुलैला अटक करण्यात आली होती. सद्या खासदार संजय राऊत यांच्या बंगल्यासमोर शीवसैनीकांचा जल्लोष सुरू आहे,
