
टांझानिया/प्रतिनीधी : महाराष्ट्र मंडळ टांझानिया (अफ्रीका) आणी भारतीय उच्चायुक्त, स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्र टांझानिया तर्फे दि 19 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 9-30 वा स्वामी विवेकानंद सांस्कृतिक टूर ड्राईव दार-ए-सलाम टांझानिया येथे शिवजयंती साजरी करण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र मंडळ टांझानिया चे अध्यक्ष व टांझानिया येथील सुप्रसिद्ध उद्योजक संभाजीराव पाटील (मुळ गाव करंबळ खानापूर) यांनी “आपलं खानापूरला” कळविले आहे,

पुढे बोलताना त्यांनी सांगितले आहे की टांझानिया (अफ्रीका) येथे प्रथमच सर्वांच्या सहकार्याने हि शिवजयंती साजरी होत आहे, व आपण महाराष्ट्र मंडळ टांझानिया तर्फे आपले सर्व सण तसेच राष्ट्रीय कार्यक्रम 15 ऑगस्ट, 26 जानेवारी सुध्दा सर्वजन एकत्र येऊन साजरे करत असतो तसेच “आपलं खानापूर” चा आपण वाचक असून प्रत्येक न्यूज पहात असतो व खानापूर तालुक्यातील व बेळगावातील प्रत्येक घडामोडी तुमच्या मुळे आम्हाला समजतात असे म्हणून “आपलं खानापूर” व समस्त मराठा बांधव तसेच शीवप्रेमीना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत,
