
बेंगळूर येथे आयोजित 13 व्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत बेळगावच्या जिल्हा क्रीडा कराटे असोसिएशनच्या कराटे पटूंनी घवघवीत यश संपादन केले. या कराटेपटूंनी स्पर्धेत विशेष चमक दाखवत तब्बल 36 पदके पटकावली आहेत.अखिल कर्नाटक स्पोर्ट्स कराटे असोसिएशन यांच्यावतीने कॅडेट , सब ज्युनियर , ज्युनियर, 21 वर्षांखालील आणि सिनिअर अशा विभागात या राज्यस्तरीय कराटे स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
या कराटे स्पर्धेत बेळगावचे कराटेपटू साई मुंगारी याने कुमितेत सुवर्ण , माही कंग्राळकरने कुमितेत सुवर्ण , कॅडेटमध्ये गौरवीने कुमितेत कांस्य , प्रज्वल पाटील याने कुमितेत सुवर्ण, सानविका काकतीकर हिने कुमितेत रौप्यपदक , अपेक्षा शेट्टीने कुमितेत कांस्यपदक , किशन तेगिनकेरीने कुमितेत रौप्य , श्रीधर कदम याने कुमितेत कांस्य , श्रीयश नाईक याने कुमितेत रौप्य , ओंकार रावलने कुमितेत कांस्य , सानविका काकतीकर हिने कटामध्ये कांस्य , आयशा रेवणकरने कुमितेत सुवर्णपदक , ऋचा लगमण्णावरने कुमितेत सुवर्णपदक , कामाक्षी रायकरने कुमितेत कांस्य पदक , प्रगती हिने कुमितेमध्ये कांस्य पदक , रिया सातेरी हिने कुमितेत कांस्यपदक , अनुज कोळी याने कुमितेत रौप्य पदक , प्रेम होनगेकरने कुमितेत कांस्य पदक , ओम जी काकतीकर याने कुमितेत कांस्य पदक , ऋषिकेश शहापूरकर याने कुमितेत कांस्य पदक , मिसबाउद्दीन खानने कुमितेमध्ये कांस्य पदक, राज पवार याने कुमितेत सुवर्ण , दिव्यानी पाटीलने कुमितेत सुवर्ण , खुशी हिरेमठने कुमितेत सुवर्ण तर सक्षम हंडे याने रौप्य, कलागौडा पाटीलने कुमितेत रौप्य , वचन देसाईने कुमितेत रौप्य , विराज लाडने कुमितेत रौप्य , वैष्णवी निर्वाणीने कुमितेत कांस्य तर अनुश्री एस . बेंबळगी हिने सुवर्ण पदक , सोनिया एस . सुळगेकरने सुवर्ण पदक , रिद्धी पाटीलने कांस्य पदक , प्राची के . पोटे हिने कांस्य पदक , अपेक्षा एम . पुजारीने कांस्य पदक , कृष्ण दामोदर देमन्नाचे याने कुमितेत सुवर्ण , रुद्र नितीन भोसलेने कुमितेत रौप्य , कुतुबुद्दीन शेखने सुवर्ण , आदित्य सोनारने कांस्य पदक , सरिता सोनार हिने कांस्य , रसूल शिंपीने कांस्य पदक , किरण गडकरी ने कांस्य पदक , केतन फाटकने कांस्य पदक पटकाविले आहे.
अध्यक्ष क्योशी अरुण मचाया आणि सेंसाई भार्गव रेड्डी , संघटन सचिव यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा यशस्वी करण्यात आल्या. बेळगावचे हे यशस्वी खेळाडूंना कराटे प्रशिक्षक गजेंद्र काकतीकर , जितेंद्र काकतीकर , रमेश अलगुडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली कराटे खेळाचा सराव करतात .
