
खानापूर : दिनांक 11
आज खानापूर येथील श्री मलप्रभा नदीच्या पात्रात बांबूच्या बेटात अडकलेला तरंगता मृतदेह असल्याचा फोन खानापूर पोलिसांना आला असता त्यांनी याची कल्पना नेहमी पोलिसांना सहकार्य करणारे व नेहमी बेवारस मृतदेहावर अंतिम संस्कार करणारे सामाजिक कार्यकर्ते कदंबा फाउंडेशनचे अध्यक्ष जॉर्डन गोन्सालवीस यांना दिली

असता क्षणाचाही विलंब न लावता ते आपल्या सहकारयासह त्या ठिकाणी गेले व पोलिसांना सहकार्य करून त्याचा पंचनामा करण्यास पोलीसांना मदत केली,
पोलिसांनी मृतदेह सडलेला असल्याने त्याच ठिकाणी डॉक्टरना बोलावून जागेवरच पोस्टमार्टम करण्यात आले व पोलिसांच्या सहकार्याने नदि तीरावर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी कदंबा फाउंडेशनचे अध्यक्ष जॉर्डन गोन्सालवीस, मायकल आंद्रादे,, कुमार थंगम, किशोर कुडाळे रूमेवाडी चे माजी ग्रामपंचायत सदस्य नारायण चौगुले, सीपीआय सुरेश शींगे, पोलीस कॉन्स्टेबल जयराम हमन्नावर, पोलीस कॉन्स्टेबल, पांडू तूरमुरी, व त्यांचे सहकारी उपस्थित होते,
