
कुपटगिरी खानापूर येथील श्री महालक्ष्मी ग्रुप तोप्पीनकट्टी संचलीत लैला साखर कारखान्याच्या वतीनें कारखान्याला ऊस पाठवीणार्या शेतकर्यांच्या खात्यात दि 31 ऑक्टोंबर 2022 पर्यंतचा पहिला हप्ता 2500 रू देण्या ऐवजी 100 रू वाढवून पहीला हप्ता 2600 रू जमा करण्यात आल्याचे कारखान्याचे चेअरमन विठ्ठलराव हलगेकर यांनी बोलाविलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले,

तसेच लवकरच 15 नोव्हेंबर पर्यंत जो शेतकरी वर्ग ऊस पाठविणार आहे त्यांची बीले ही लवकरच ताबडतोब जमा करणार असल्याचे सांगितले, व मागील वर्षी कारखान्याला ऊस पाठवीलेल्या शेतकर्यांना प्रती टन 1/2 की. प्रमाणे साखर 25 रू प्रती किलो अल्पदरात सोमवार दि 14 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर 2022 पर्यंत वाटप करण्यात येणार असून शेतकर्याना घेऊन जाण्याची विनंतीही त्यांनी केली आहे, यावेळी त्यांच्यासोबत साखर कारखान्याचे एम डी सदानंद पाटील, प्रोसेस विभागाचे जी एम अनिलकुमार लोभे, ऊस विभागाचे जी एम बाळासाहेब शेलार, व संचालक उपस्थित होते,

बोलताना त्यांनी पुढे सांगितले की यावर्षीचा गळीत हंगाम 24 ऑक्टोंबर 2022 रोजी सुरू झाला असून यावर्षी जवळजवळ पाच लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट असून शेतकऱ्यांनी आपला ऊस फॅक्टरीला पाठवून सहकार्य करावेत तसेच ऊस भरलेल्या ट्रका कारखान्याला ऊस जास्त येत असल्याने खाली होण्यास थोडा वेळ लागत आहे त्यासाठी सुद्धा शेतकरी वर्गाने सहकार्य करण्याची विनंती त्यांनी केली आहे यावेळी कारखान्याचे संचालक चांगाप्पा निलजकर, सुबराव पाटील,बाळगौडा पाटील, परशराम तोराळकर,विठ्ठल करंंबळकर, यल्लाप्पा तिरविर, पुंडलिक गुरव, भरमाणी पाटील ०व शेतकरी विनायक मुतगेकर खानापूर तालुका ग्रामपंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष, तसेच माजी तालुका पंचायत सदस्य मर्याप्पा पाटील व आदी शेतकरी वर्ग व पत्रकार मंडळी उपस्थित होती
