
हेब्बाळ ता खानापूर हे गाव खानापूर – नंदगड (यल्लापूर) मार्गावर असून नंदगड, बीडी, यल्लापूर, हल्यााळ, कारवार धारवाड या भागातील गाड्यांची वर्दळ फार असते पण तालुक्यातील नेतेमंडळींचे दुर्लक्ष झाल्याने या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे,

हेब्बाळ गावातुन जाणाऱ्या रस्त्यावर सुध्दा खड्डे पडले आहेत लहान मोठे अपघात होत आहेत, हे त्या गावातील लहान मुलांच्या लक्षात आले व त्यांनी विचार करून ते रस्त्यावरील खड्डे माती टाकून मुजवण्यास सुरू केले असता योगायोगाने बरगाव ग्रां पं सदस्य प्रमोद सुतार आपले नंदगड येथील काम आटपून आपल्या गावाकडे जात असताना त्यांनी ही घटना पाहिली, व त्यांचे फोटो काढून त्यांची नावे लिहून घेतली व त्यांचे कौतुक केले, खड्डे मुजवण्यास हेब्बाळ गावातील साईनाथ गुरव, श्रीनिवास गुरव, मनीष गुरव, सोमनाथ गुरव, युवराज तलवार, या लहान मुलानी भाग घेवुन ते खड्डे सुध्दा मुजवले व पुढील लहान मोठे अपघात होण्यापासून टाळले, “आपलं खानापूर” कडुन या बालकांना मानाचा मुजरा,
