
मनिगाव (मध्यप्रदेश): आई आणि मुलाने मिळून घरात 10 कोटी रूपयांच्या नकली नोटा छापल्याची एक घटना समोर आली आहे. नंतर या नकली नोटा अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांना विकल्या. या प्रकरणी आई आणि मुलाला तुरूंगात डांबण्यात आलं आहे. मध्य प्रदेशात कोर्टात नुकतीच याबाबत सुनावणी झाली आहे. लांब चौकशीनंतर पोलिसांनी आई आणि मुलाला अटक केली आहे.
मिररनुसार, आई मंजु आणि मुलगा सुरज आपल्या घरात 10 कोटी रूपयांच्या नकली नोटा छापल्या होत्या. कोर्टाच्या सुनावणीत सांगण्यात आलं की, कशाप्रकारे दोघे नकली नोटा छापत होते.पोलिसांनी आणि नॅशनल काउंटरफिट करन्सी एजन्सीने नोटा चलनात आल्यावर चौकशी केली. नंतर याबाबत खुलासा केला.
नकली नोटा वापरण्याबाबत नॅशनल क्राइम एजन्सीने सूचना दिली होती. आरोपींच्या घरावर छापा मारण्यात आला. यादरम्यान अधिकाऱ्यांना 2 कोटी रूपयांच्या नकली नोटा सापडल्या. त्याशिवाय आरोपीच्या दुसऱ्या ठिकाणावर डाय, प्रिंटर्स सापडले ज्याचा वापर नकली नोटा छापण्यासाठी केला जात होता.
चौकशीतून समोर आलं की, या साहित्यांच्या माध्यमातून आई-लेकाने 10 कोटी रूपयांच्या नकली नोटा छापल्या. नंतर या नोटा अंडरवर्ल्डच्या लोकांना विकल्या. यासंबंधी अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नकली नोटा गुन्ह्यासाठी वापरण्यात आल्या होत्या. कोर्टात 14 डिसेंबरला मंजुला साडे सहा वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. तर मुलाला 2 वर्ष बाल कारागृहात ठेवण्यात येणार आहे.
