
गुंडोळी ता खानापूर येथील बजरंगदल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हनुमान माला कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून हिंदूत्ववादी भाजपा युवा नेते पंडित ओगले यांना आमंत्रित करण्यात आले होते,

यावेळी पंडित ओगले यांनी प्रभू श्री राम व हनुमान यांच्याबद्दल आध्यात्मिक मार्गदर्शन केले, यावेळी तेथे उपस्थित असलेल्या युवकांनी श्रीराम व हनुमान यांचे पुजन करून महा आरतीत भाग घेतला,

सदर कार्यक्रम गेली सात ते आठ वर्षापासून सातत्याने आयोजित करण्यात येत असुन सदर उत्सवाला मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते,
