
सीमा समन्वयमंत्र्यांचा बेळगाव दौरा 3 ऐवजी 6 डिसेंबरला महाराष्ट्राचे सीमा समन्वय मंत्री चंद्रकांत पाटील व शंभूराज देसाई यांचा बेळगाव दौरा लांबणी वर पडला आहे. याबाबतची माहिती मंत्री पाटील यांनी टिव्टच्या माध्यमातून दिली आहे. दोन्ही सीमा समन्वय मंत्री व सीमा प्रश्नासाठी स्थापन केलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष खासदार धैर्यशील माने हे आता 6 डिसेंबरला बेळगावात येणार आहेत.
