
गेली चार दशके महाराष्ट्रात पक्षी विषयक कार्य करणारी संस्था महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेच्या वतीने देण्यात येणारा सण 2022 च्या पुरस्काराची घोषणा संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर यांनी पक्षी सप्ताह निमित्य जाहीर केले यावर्षीचा पक्षी जनजागृती पुरस्कार हा पक्षी मित्र चळवळीतील पक्षी अभ्यासक आणि जनजागृती पक्षी निवडणुकीच्या माध्यमातून पक्षी विषयक जनजागृती अधीक्षेत्रात कार्यरत गडहिंग्लज येथील अनंत पाटील (मुळ गांव कौंदल, निडगल,ता.खानापुर )यांना जाहीर करण्यात आला आहे

रोख रक्कम मानपत्र आणि स्मृती चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप असून हा पुरस्कार अविनाश शिरोडे नाशिक यांचे तर्फे प्रायोजित करण्यात आलेला आहे,या पुरस्काराचे वितरण 35 व्या महाराष्ट्र पक्षी मित्र संमेलनात करण्यात येणार असून यावर्षी महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन चंद्रपूर येथे फेब्रुवारी 2023 मध्ये होणार आहे या पुरस्काराचे वितरण संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर जयंत वडतकर यांनी दिली आहे,
