
खानापूर : संपूर्ण खानापूर तालुका व बेळगाव जिल्ह्यात श्री क्षेत्र असोगा म्हणून प्रसिद्ध असलेले श्री रामलिंगेश्वर मंदिर व श्री रवळनाथ मंदिराचा जिर्णोद्धार विधी व उदघाटन सोहळा शुक्रवार दि 3 फेब्रुवारी 2023 रोजी सकाळी 10-30 वा आयोजित करण्यात आला असून समारंभाच्या अध्यक्षस्थानी श्री रामलिंग देव ट्रस्ट कमिटीचे चेअरमन जयवंत पाटील असुन यावेळी विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे,

श्री रामलींगेश्वर मंदिराचे उदघाटन भाजपाचे जेष्ठ नेते विठ्ठलराव हलगेकर व खानापूर तालुक्याच्या आमदार अंजलीला निंबाळकर यांच्या यांच्या हस्ते करण्यात येणार आहे तर गाभाऱ्याचे उदघाटन राज्यसभेचे खासदार ईराण्णा कडाडी व माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे, तर कळसारोहण श्री पिरयोगी भयंकरनाथजी महाराज डोंगरगाव मठ यांच्या हस्ते करण्यात येणार आहे,
श्री रवळनाथ मंदिराचे उदघाटन माजी आमदार अरविंद पाटील व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते करण्यात येणार असून गाभाऱ्याचे पूजन माजी आमदार व भाजपाचे जिल्हा अध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, यावेळी प्रमुख वक्ते म्हणून भाजपाचे तालूका अध्यक्ष संजय कुबल व भाजपाचे युवा नेते पंडित ओगले उपस्थित राहणार आहेत, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एडवोकेट चेतन मणेरीकर व संदीप सोमान्ना पाटील हे करणार आहेत,
यावेळी विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी उपस्थित राहणार असून सर्वानी उपस्थित राहण्याचे आवाहन श्री रामलिंग देव ट्रस्ट असोगा व श्री रवळनाथ देव ट्रस्ट असोगा, तसेच पंचकमीटी व ग्रामस्थांनी केली आहे,
