
खानापूर : खानापूर जेडीएसचे उमेंदवार नासीर बागवान यांच्या वाढदिवसाची जय्यत तयारी श्री मलप्रभा क्रीडांगणावर सुरू आहे, या कार्यक्रमाला माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी, राज्य अध्यक्ष सि एम इब्राहीम, व आदी मंडळी उपस्थित राहणार आहेत,

नासीर बागवान यांनी सांगितले आहे की उद्या गुरूवार दि 2 जानेवारी रोजी आपला वाढदिवस वारकरी मंडळींच्या उपस्थितीत संत परंपरेनुसार त्यांचा वाढदिवस वारकरी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले आहे, पुढे बोलताना त्यांनी सांगितले आहे की मी कोणत्याही जातीपुरता मर्यादित नसून, मी जगदज्योती बसवण्णांचा अनुयायी असून सर्व धर्म समान माननारा आहे व तसे मी माझ्या जीवनात आचरण करत आहे.

2 फेब्रुवारी रोजी सकाळी छत्रपती शिवाजी महाराज, जगज्योती बसवेश्वर महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मिरवणूक सुरू होईल व खानापूर शहरातील मलप्रभा क्रीडांगणाकडे प्रयाण होईल. यावेळी त्याच्यासोबत तालुका अध्यक्ष एम.एम.साहुकार, महिला जिल्हा अध्यक्षा मेघा कुंदर्गी, विशाल पाटील. व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते,

