
बाबुराव ठाकूर कॅालेजच्या सभागृहामध्ये ‘संजीवनी महीला स्वसाहाय्य संघातर्फे’ नुकताच ‘महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. समारंभाच्या अध्यक्षस्थानी सौ धनश्री सरदेसाई जांबोटीकर भाजपा महिला कार्यकारीणी सदस्या होत्या

यावेळी चापोली, कापोली, ओलमनी, जांबोटी, बाजारपेठ, वडगाव, मुडगई ह्या गावातील व परीसरातील महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग दर्शवला. कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवीलेल्या धनश्री सरदेसाई यांनी महिलांना मार्गदर्शन केले
यावेळी विविध खेळ खेळून व ग्रूप डान्स करून महीलांनी आनंद साजरा केला. याप्रसंगी मुख्याध्यापक महेश सडेकर यांनी सर्व कार्यक्रमाची धुरा सांभाळली. व्यासपीठावर माजी झेडपी श्री जयराम देसाई, श्री विठ्ठल हलगेकर, लैला शुगरचे एमडी श्री सदानंद पाटील, ॲड. आकाश अथनीकर, अभिजीत चांदीलकर, जांबोटी ग्रामपंचायत च्या माजी अध्यक्षा रेणूका गोवेकर, सदस्या अनुराधा सडेकर, उपाध्यक्षा मयुरी सुतार उपस्थित होते,



