
खानापूर : संपूर्ण देशभरात दाढी वाढवीलेले 45 हजार शिवाजी महाराज आहेत पण सगळे बीन कामाचे आहेत, दाढी वाढवुन शिवाजी महाराज होण्यापेक्षा युवकांनी त्यांचे गुण आत्मसात केले पाहिजे शिवाजी महाराज 35 विषय शिकले, रयतेस पोटास लावणे साठी स्वराज्य निर्माण करणे हे छत्रपती शिवाजी महाराजांचे ध्येय होते,
युवकांनी पुढे आपले एक ध्येय ठेवून आयुष्याची सुरुवात केल्यास निश्चितच ध्येय गाठता येईल, असे प्रतिपादन प्रसिद्ध शिवव्याख्याते व राजमाता जिजाऊ मॉंसाहेबांचे वंशज व पालक मेळाव्याचे प्रमुख वक्ते नामदेवराव जाधव यांनी खानापूर येथील शुभम गार्डन मध्ये घेतलेल्या मराठी भाषिकांच्या पालक मेळाव्यात केले,

मी मराठी आम्ही मराठी हि चळवळ जागृत करण्यासाठी खानापूर तालुक्यातील आदरणीय साहित्यिक, सामाजिक विचारवंत, इतिहास व संत साहित्याचे गाढे अभ्यासक, सीमा चळवळीतील अग्रणी नेते, बहूजन समाजाचे आधारस्थंभ स्वर्गीय श्रीमंत उदयसिंह दत्ताजीराव सरदेसाई खानापूर यांच्या अमृत महोत्सवी पुण्यस्मरणार्थ रविवार दि 19 मार्च रोजी मराठी भाषिकांच्या आयोजित मेळाव्यात ते प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते,

पुढे बोलताना ते म्हणाले की युवकांनी मोबाईलचा जास्त वापर करू नयेत त्याऐवजी युवकांनी हातात पुस्तके पकडावीत कारण मोबाईल हातात पकडल्यास आत्महत्या करण्यास सांगतो, तर पुस्तके हातात पकडल्यास ज्ञान मिळते व आत्महत्या करण्यापासून परावृत्त करते, मराठा समाजात लग्नकार्य वाजत गाजत पैशाची उधळपट्टी करून केली जाते त्या ऐवजी लग्न साधेपणाने करून जे पैसे वाचतात ते नवरा मुलगा व नवरी मुलीच्या नावावर ठेवावेत कींवा त्या पैशातून त्यांना एखाद्या उद्योग निर्माण करून द्यावात,

मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी बाळेवाडी मठाचे मठाधिश पीर सिंगनाथ महाराज उपस्थित होते, व्यासपीठावर माजी आमदार दिगंबरराव पाटील, जेष्ठ नेते देवाप्पाआण्णा गुरव, नामदेवराव जाधव, साहित्यिक गुणवंत पाटील, पीटर डिसोझा, प्रकाश चव्हाण, चांगळेश्वरी शिक्षण संस्थेचे वाय एन मजकूर, निरंजन सरदेसाई, समितीचे सेक्रेटरी सीताराम बेडरे, अध्यक्ष गोपाळराव देसाई, कार्याध्यक्ष यशवंत बीर्जे, खजिनदार संजय पाटील, माजी सभापती मारूतीराव परमेकर, नारायण कापोलकर, आय एम गुरव, व आदि मान्यवर उपस्थित होते,

कार्यक्रमांची सुरूवात ईशस्तवन व स्वागत गीताने झाली, त्यानंतर दिप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुर्तीचे पुजन करण्यात आले त्यानंतर कान्सुली, नागुर्डा, गावच्या कमीटीच्यावतीने स्वर्गीय श्रीमंत उदयसिंहराव सरदेसाई यांच्या फोटोचे पुजन करण्यात आले, यावेळी अबनाळी गावच्या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची क्रीडा स्पर्धेत राज्यस्तरीय नीवड झाल्याबद्दल त्यांचा व 10 वीच्या वर्गात प्रावीण्य मीळवीलेल्या विद्यार्यांचा व दुर्गम भागात शिक्षक म्हणून सेवा बजावत असलेल्या शिक्षकांचा सत्कार करण्यात आला,
सुरूवातीला प्रास्ताविक व पाहुण्याचा परिचय पीराजी कुऱ्हाडे यानी केला, तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशांत अळवणी यांनी केले,

यावेळी माजी आमदार दिगंबरराव पाटील बोलताना म्हणाले की या घराण्याचा सीमा चळवळीसाठी व तालुक्याच्या विकासासाठी भरपूर त्याग असुन कै माजी आमदार निळकंठराव सरदेसाई यांनी जमीन विकुन प्रसंगीं आपल्या आईंचे व पत्नीचे सोने सुध्दा सीमा चळवळीसाठी वीकले असल्याचे सांगितले व आपण सर्वांनी या घराण्याचा त्याग कायमस्वरूपी नवीसरता लक्षात ठेवला पाहिजे
यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना या मेळाव्याचे आयोजक निरंजन सरदेसाई म्हणाले की तालुक्यात व्यसनाधीनता फार वाढली असून सर्वत्र गांजा, व ईतर अमली पदार्थाचे सेवन तरुण युवक वर्ग व विद्यार्थी करत असुन, मोबाईलचा पण अती वापर फार वाढल्याने तरूण विद्यार्थी व युवक आत्महत्या करत आहेत हे कुठे तरी थांबले पाहिजे या साठी तरूण वर्गात जागृती निर्माण करून त्यांना व्यसनाधीनता व आत्महत्या करण्यापासून रोखण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करून त्यांच्यात परिवर्तन घडविण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याचे सांगितले,
साहित्यिक पीटर डिसोझा म्हणाले की विद्यार्थ्यांनी परिक्षेत सात्यत ठेवुन आभ्यास केल्यास परिक्षेत हमखास व यश हे मीळतेच त्यासाठी विद्यार्थ्यांनी सातत्याने अभ्यास करावेत,
यावेळी साहित्यिक गुणवंत पाटील, समीतीचे कार्याध्यक्ष यशवंत बीर्जे व आदी मान्यवरांची भाषणे झाली, मेळाव्यासाठी मुरलीधर पाटील, आबासाहेब दळवी, संभाजीराव देसाई, तालूक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून विद्यार्थी, पालक, शिक्षक, व साहित्यिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
मेळावा यशस्वी करण्यासाठी रमेश धबाले, नागेश भोसले, मुकुंद पाटील, विनोद पाटील नगरसेवक व चेअरमन स्थायी समिती, पिराजी कुऱ्हाडे, धनेश देसाई, भास्कर पाटील, बाळासाहेब चापगावकर , गोविंद पाटील, वासुदेव चौगुले, जयराज चापगांवकर, ज्ञानेश्वर पाटील, कृष्णा धुळ्याचे, वासू ओलमनकर, शंकर किनेकर, मारुती कालमनकर, मल्लाप्पा कुकडोळकर, प्रशांत अळवणी, शेखर पाटील, प्रल्हाद मादार, अभिजीत सरदेसाई, प्रकाश अंगडी, प्रवीण सरदेसाई, जगदीश सरदेसाई, रणजीत पाटील खानापूर, रणजीत पाटील हलगा, प्रवीण सरदेसाई, दिग्विजय सरदेसाई, यशोधन सरदेसाई, जय भतकांडे, शिवाजी देसुरकर, मारुती पाखरे, यांनी सहकार्य केले,
