
रविवार दिनांक 25 डिसेंबर देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त वाजपेयी आश्रय योजनेखाली नगर उभारण्यात आले असून त्या ठिकाणच्या वस्तीचे नामकरण फलक वाजपेयी नगर म्हणून भाजपच्या नेतेमंडळींच्या उपस्थित बसविण्यात आलेला नामकरण फलक खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी राजू के वटार यांनी आज दुपारी जेसीबी द्वारे उकडून काढल्याने खानापुरात तणाव परिस्थिती निर्माण झाली होती,

भाजपचे युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली सर्व युवा कार्यकर्ते पंचायतीसमोर धरणे धरून बसले होते चीफ ऑफिसरचा धिक्कार करण्यात येत होता चिप ऑफिसर नी माफी मागावीत अशी जोरदार मागणी ही करण्यात आली शेवटी चिप ऑफिसर राजू वटार यांनी माफी मागितली व दिलगिरी व्यक्त केली व नगरपंचायतींनी आणलेला बोर्ड कार्यकर्त्यांच्या स्वाधीन करण्यात आला यावेळी झालेल्या धरणे सत्याग्रहात खानापूरचे नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनीही भाग घेतला होता त्यांनीही चीप ऑफिसर ची कान उघाढणी केली, कारण नाम फलक बसवताना भाजपच्या नेतेमंडळी सोबत तेहि उपस्थित होते

भाजपाचे तत्कालीन माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी केंद्र सरकारकडे त्यावेळी प्रयत्न करून वाजपेयी आश्रय योजना मंजूर करून आणली होती व त्यासंबंधीत लाभार्थींना जागा आणि घरे बांधण्यासाठी पैसे देण्यात आले व हक्क पत्र देताना त्याच्यावर उल्लेख सुद्धा वाजपेयी योजने असा होता आणि माजी आमदार कै प्रल्हाद रेमाणी यांनीच या नगराला वाजपेयी नगर म्हणून जाहीर केले होते व दोन वर्षा पाठीमागे नगरपंचायतीत आश्रय कॉलनीतील नागरिकांनी वाजपेयी नगर नाम करण्यात यावे म्हणून अर्जही दिला होता व तसा ठराव नगरपंचायतीत करण्यात हि आला होता व त्याला अनुसरून वाजपेयी यांचा वाढदिवस रविवार दिनांक 25 डिसेंबर होता म्हणून त्या निमीत्ताने भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, तालुकाध्यक्ष संजय कुबल भाजपाचे नेते विठ्ठल हलगेकर माजी आमदार अरविंद पाटील नगराध्यक्ष नारायण मयेकर, किरण येळूरकर विजय कामत धनश्री सरदेसाई व आदि नेते मंडळीच्या उपस्थित सदर फलकाचे नामकरण करण्यात आलेला बोर्ड बसविण्यात आला असता आज सदर नाम फलक मुख्याधिकारीनी काढल्याने हा तणाव निर्माण झाला होता

सदर नाम फलक पुन्हा त्या जागी लावण्यासाठी भाजपच्या कार्यक्रत्याकडे मुख्याधिकारीनी सुपूर्द केला असता नगर पंचायती समोर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, व ढोल ताश्याच्या गजरात आतिषबाजी करत राजा शिवछत्रपती चौकापर्यंत भाजपाचे युवा नेते पंडित ओगले यांच्या नेतृत्वाखाली विजयी मिरवणूक काढण्यात आली यावेळी कै माजी आमदार प्रल्हाद रेमाणी यांचे सुपुत्र जोतीबा रेमाणी, कीरण यळूरकर, आनंद पाटील, जॉर्डन गोन्सालवीस यांनी सहभाग दर्शविला होता,

यानंतर वाजपेयी आश्रय कॉलनी येथे जाऊन नामफलक काढलेल्या जागीच नामफलक बसविण्यात येवुन पंडित ओगले यांच्या हस्ते हार घालून श्रीफळ वाढविण्यात येवुन पुजा करण्यात आली, यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य भाजपा नेते जोतीबा रेमाणी, भाजपा नेते कीरण यळूरकर, जेष्ठ नेते आनंत पाटील, यांची प्रशासनाला व यामध्ये राजकारण करणार्यांना धमकी वजा ईशारा देणारी भाषणे झाली, यावेळी भाजपाचे व हिंदुत्ववादी संघटनेचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी आश्चर्याची गोष्ट अशी की सदर नाम फलक बसवताना उपस्थित असलेले व भाजपाच्या आमदार पदासाठी इच्छुक असलेली बरीचशी नेतेमंडळी कीरण यळूरकर व जोतीबा रेमाणी सोडून एकाही नेत्याने या आंदोलनात भाग घेतला नाही त्यामुळे कार्यकर्ते संतप्त प्रतिक्रिया देत होते
