
भारतीय जनता पार्टी खानापूरच्या वतीने माजी विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुकाध्यक्ष संजय माजी आमदार अरविंद पाटील भाजपचे नेते विठ्ठलराव हलगेकर धनश्री सरदेसाई, गुंडू तोपीनकट्टी वन खात्याचे संचालक सुरेश देसाई गजानन पाटील आदी नेतेमंडळीच्या उपस्थितीत राज्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना निवेदन देण्यात आले,

निवेदनामध्ये म्हटले आहे की खानापूर तालुक्यात होऊ घातलेला कळसा भांडुरा प्रकल्पात लहान लहान गावांना छोटे छोटे बंधारे बांधण्यात येऊन त्या गावांना शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात यावात, तसेच फार वर्षापासून जे शेतकऱी वनखात्याच्या जमीनी अतिक्रमण करून कसंत आहेत त्या जमीनी कायमस्वरूपी त्यांच्या नावावर करण्यात याव्यात

तसेच तालुक्यामध्ये 51 ग्रामपंचायती असून त्यांची संख्या वाढवून 65 करण्यात यावीत, तसेच तालुका पंचायत सदस्यांची संख्या वाढवून 27 करण्यात यावीत व जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढवून आठ करण्यात यावीत आणी नगरपंचायतीचा दर्जा वाढवून नगरपरिषद करण्यात यावीत व खानापूर शहरात होणारी ड्रेनेज योजना लवकरात लवकर सुरू करण्यात यावीत व शहराला 24 × 7 तास पाणीपुरवठा योजना मंजूर करावीत तसेच तालुक्यात 100 पेक्षा जास्त नाले आहेत त्या नाल्यांना वाळू साठा मुबलक आहे त्यासाठी त्या ठिकाणी अटी घालून वाळू काढण्यास परवानगी देण्यात यावीत अशाप्रकारच्या विविध मागण्या करण्यात आल्या असून मुख्यमंत्र्यांनी सदर निवेदन स्वीकारले असून लवकरात लवकर सर्व मागण्या मंजूर करण्यात येतील अशी ग्वाही दिली,
