
देशाचे पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्म दिनाचे औचित्य साधून भाजपचे नेतेमंडळी तालुका अध्यक्ष संजय कुबल, विट्ठलराव हालगेकर, माजी आमदार अरविंद पाटील, नगराध्यक्ष नारायण मयेकर, विजय कामत, किरण यळूरकर, बाबूराव देसाई, सौ धनश्री सरदेसाई, नगराध्यक्ष नारायण मयेकर, राजेंद्र रायका, गुंडू तोपिनकट्टी, आप्पया कोडोळी, अनंत पाटील, प्रकाश निलजकर, महांतेश बाळेकुंद्री, रवींद्र बड़ीगेर, शिवू आचार्य, कार्यकर्ते, व नागरिक यांच्या प्रमुख उपस्थित वाजपेयी नगर येथे वाजपेयी नगर म्हणून नामफलक बसविण्यात आला होता पण दुसरे दिवशीच नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आर के वटारी यांनी राजकीय दबावाखाली सविस्तर माहिती न घेता सदर नामफलक जेसीबी द्वारे उखडून काढला होता व याचे पडसाद ताबडतोब उमटले व भाजपाचे युवा नेते पंडित ओगले व कार्यकर्त्यांनी नगरपंचायतीसमोर ठिय्या आंदोलन करून मुख्याधिकारीना जाब विचारून धारेवर धरले असता मुख्याधिकार्यानी दिलगिरी व्यक्त करून माफी मागितली व सदर बोर्ड पुन्हा वाजपेयी नगर येथे लावण्यासाठी आंदोलनकर्त्यांच्या हाती दिले पण नेमके त्याच दिवशी तालुक्यातील भाजपाचे मुख्य नेते मंडळी जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुकाध्यक्ष संजय कुबल माजी आमदार अरविंद पाटील भाजपा नेते विठ्ठलराव हलगेकर धनश्री सरदेसाई वन निगम राज्य संचालक सुरेश देसाई, गुंडू तोप्पीनकट्टी तालुक्यातील समस्या घेऊन मुख्यमंत्री व इतर खात्याच्या मंत्र्यांना भेटण्यासाठी नेमके त्याच वेळेला बेळगाव येथील सुवर्णसौध मध्ये उपस्थित होते त्यावेळी खानापूरात वाजपेयी नगर नाम फलकाबद्दल घडलेली माहिती समजताच त्यांनी ताबडतोब माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सौदी यांच्यासह त्या खात्याच्या मंत्र्यांची भेट घेऊन सदर घटना त्यांच्या कानावर घातली असता सदर मंत्र्यांनी ताबडतोब खानापूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी आर के वटारी यांच्या बदलीचे आदेश दिले असल्याचे समजते व सदर आदेश आज किंवा उद्या नगरपंचायतीला मिळतील असे खात्रीलायक वृत्त आहे
