
गोव्याहून बेळगाव कडे कचरा वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात होऊन सदर ट्रक कलंडल्याने ट्रकेतील कचरा रस्त्यावर पडल्याने त्या ठिकाणी अत्यंत घाणेरडी अशी दुर्गंधी पसरली आहे अपघातात ट्रक ड्रायव्हर किरकोळ जखमी झाला असून सदर अपघात कुसमळी जांबोटी च्या मध्ये असलेल्या आळंबी फॅक्टरी जवळ झाल्याचे समजते क्रेन द्वारे ट्रकला बाजूला काढण्यात आले आहे,
गोव्याहून बेळगाव कडे दररोज पाच ते सहा ट्रक कचरा बेळगाव कडे वाहतूक केला जात असल्याची माहिती जांबोटी भागातील नागरिकांनी दिली असून गोव्याचा कचरा बेळगावकडे कशासाठी पाठविला जातो याची चौकशी करण्याची सुद्धा मागणी नागरिकातून होत आहे,
