
आज सकाळी खानापूरचे तहसीलदार व निवडणूक अधिकारी प्रवीण जैन यांच्याकडे नारायण मयेकर यांनी खानापुरातील सर्व वीस नगरसेवकांच्या पाठिंब्याने त्यांच्या उपस्थितीत नगराध्यक्ष पदाचा अर्ज सादर केला असल्याने त्यांचा एकच अर्ज नगराध्यक्ष पदासाठी राहिला असल्याने अनौपचारिक रित्या सकाळीच त्यांची नगराध्यक्षपदी निवड झालेली होती परंतु आज दुपारी दोन वाजता अर्ज छाननी करून औपचारिक रित्या नगराध्यक्षपदी नारायण मयेकर यांची निवड झाल्याचे तहसीलदार प्रवीण जैन यांनी जाहीर केले व त्यांना पुष्पहार घालून त्यांचे अभिनंदन केले, यानंतर भाजपा नेते विठ्ठलराव हलगेकर यांनी त्याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला व त्याना शुभेच्छा दिल्या, यानंतर नगरसेवक लक्ष्मण मादार, आप्पया कोडोळी, प्रकाश ओगले, माजी नगराध्यक्ष मझर खानापूरी, स्थायी कमिटी चेअरमन प्रकाश बैलूरकर, नगरसेविका मेघा कुंदरगी, सामाजिक कार्यकर्ते भरमानी पाटील, यांची शुभेच्छा देणारी भाषणे झाली, शेवटी नुतन नगराध्यक्ष नारायण मयेकर यांनी सर्वांचे आभार मानले व शहराच्या विकासासाठी आपण कटीबद्ध असल्याची ग्वाही त्यांनी दिले,
नारायण मयेकर यांची नगराध्यक्षपदी झालेली बिनविरोध निवड व अर्ज भरताना संपुर्ण नगरसेवकांची राहिलेली उपस्थिती खानापूर नगरपंचायत निवडणुकीच्या ईतिहासात घडलेली हि पहिलीच घटना आहे,
