
नेहरू युवा केंद्र बेळगाव, व कर्नाटक ग्रामीण विकास संघटना कामाशिनकोप्प ता खानापूर आणि कक्कया शिक्षण संस्था कर्नाटक राज्य युवक संघटना तालुका घटक खानापूर यांच्या वतीने 2022-2023 या वर्षासाठी ग्रामस्थरीय लेवल क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

कक्केरी ता खानापूर येथील श्री बिष्टमा देवी हायस्कूलच्या प्रांगणात ग्रामीण स्तरावरील क्रीडा स्पर्धा पार पडल्या कक्केरी ग्रामपंचायतीचे अध्यक्ष भीमप्पा अंबोजी यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला.

KPCC अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष रियाजअहमद पटेल यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला, रोहीत कलार यांची प्रमुख उपस्थिती होती, यावेळी अशोक उळ्ळागड्डी, आर.वाय. बेन्नुर, कार्तिक अंबोजी, विठ्ठल हिंडलगेकर, नारायण चन्नापुर, कुश अंबोजी, अर्जुन मांजलकार, वीरणागौडा पाटील, सुनील राठोड, आदी मान्यवर मंडळी उपस्थित होती,

या क्रीडा स्पर्धेत कक्केरी व परिसरातील गावातील तरुणांनी सहभाग घेतला होता, व्हॉलीबॉल स्पर्धेत इटगी गावातील संघाने प्रथम क्रमांक तर कबड्डी स्पर्धेत कक्केरी गावातील संघाने प्रथम क्रमांक पटकावीला, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री नागेंद्र चौगुला अध्यक्ष कर्नाटक ग्रामीण विकास संस्था यांनी केले
