
बेळगाव : विणकरांची अनेक दिवसांची मागणी पूर्ण करून ऐतिहासिक निर्णय घेणाऱ्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा 19 डिसेंबर रोजी बेळगाव येथील सुवर्णसौध येथे विशेष सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता.
बेळगावी शहर व परिसरातील नेकार, कुरुविनशेट्टी, देवांग, हटगारा देवंगा समाज, सकुसाई समाज, नामदेव सिंपी यासह विविध समाजाच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी मुजराई हज व वक्फ मंत्री शशिकला जोल्ले,आमदार लक्ष्मण सवदी,आमदार महादेवप्पा,आमदार अभय पाटील, कित्तूरचे आमदार महांतेश दोड्डागौडा, आमदार दोडना गौडा पाटील यांची भाषणे झाली.
या सोहळ्याला जलसंपदा मंत्री तथा बेळगाव जिल्हा प्रभारी मंत्री गोविंद काराजोळ, गृहराज्यमंत्री अरगा ज्ञानेंद्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सी.सी.पाटील, बेळगाव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके, वस्त्रोद्योग महामंडळाचे उपाध्यक्ष सुरेश कित्तूर, विणकरांसह विविध समाजाचे नेते उपस्थित होते.
समारंभाला बेळगाव, निप्पाणी, तेरदाळ, इलकल, कित्तूर मतदारसंघातील विणकर समाजातील महिला, युवक व इतर उपस्थित होते.
