
कुपटगीरी ता खानापूर प्राथमिक मराठी शाळेच्या भिंतीना तडे जाऊन भींती धोकादायक बनल्या असुन विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाले असल्याची माहिती भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी तालुका अध्यक्ष संजय कुबल यांना मिळताच
त्यांनी आज कुपटगीरी गावातील शाळेला भेट देऊन पाहणी केली व तेथूनच मोबाईल द्वारे खानापूर तालुक्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांना संपर्क साधला व सदर धोकादायक भिंतीची दुरुस्ती ताबडतोब करण्याची सूचना केली यावेळी भाजपा जनरल सेक्रेटरी गुंडू तोपिनकट्टी सामाजिक कार्यकर्ते शंकर पाटील रामा पाटील ग्रामपंचायत उपाध्यक्षा व शिक्षक वर्ग उपस्थित होता,
