
खानापूर : रूमेवाडी कत्री पासुन 150 मीटर अंतरावर एन बी राज हॉटेल समोर भल्या मोठ्या आंब्याच्या झाडाची फांदी तुटून पडल्याने थोडावेळ वहातूक ठप्प झाली, पण थोड्या वेळाने झाडाच्या बाजूने शेतवडीतून गाड्या सावकाश जात राहिल्याने वहातूक कासवाच्या चालीने सुरळीत सुरू झाली, पण वाहनधारकांना रस्त्यावर पडलेल्या झाडाचा अंदाज येत नसल्याने जवळ आल्यानंतर अचानक ब्रेक मारावा लागत होता त्यामुळे धोका निर्माण झाला होता पण या परिसरात रहाणारे सामाजिक कार्यकर्ते लायन्स क्लबचे सदस्य आश्रफ नाईक आपल्या मित्रपरिवारासह त्याठिकाणी थांबुन बॅटरी पेटवुन वहान धारकांना सिग्नल देवुन वाहने सावकाश हाकण्यास सांगत होते

शेवटी त्यांनी “आपलं खानापूर” सी संपर्क साधला व मदत मागितली असता ताबडतोब आम्ही त्याची कल्पना पोलीसांना दिली असता पोलीसांनी फॉरेस्ट खात्याला याची कल्पना दिली असता त्यांची माणसे ट्रक्टर व लाकुड कापण्याची मशीन घेऊन आले व सदर पडलेली झाडाची मोठी फांदी कापून रस्ता मोकळा केला असता रात्री वहातूक सुरळीत सुरू झाली आहे,
