
मजगाव येथील तरुणाचा मच्छे येथील शेतवाडीत खून
बेळगाव : मजगाव येथील तरुणाचा चाकू
आणि जांबियाने भोसकून
खून
केल्याची घटना मच्छे ये
थील शेतवडीत घडली.
याबाबत पोलीस सूत्राकडून समजलेली अधिक माहिती अशी की मजगाव लक्ष्मी गल्लीतील
युवक प्रतीक एकनाथ लोहार (वय23) या युवकाला गावातील एका तरुणाने आपल्या दुचाकीवरून मच्छे ब्रह्मलींग मंदिर शेजारी शेतवाडीमध्ये
आणले व त्यानंतर त्याचा चाकू व जांबीयाने भोसकून खून केला.
प्रतीक लोहार याचा खून करून आरोपी पुन्हा मजगाव गावामध्ये फिरत असताना गावातील इतर तरुणांनी त्याला पकडून त्याच्या गाडीची मोडतोड केली. यावेळी संबंधित आरोपी तरुणांच्या हातातून निसटून फरारी झाला.
संबंधित आरोपीवर या आगोदर उद्यमबाग पोलीस ठाण्यात हाफ मर्डर, गांजा विक्री करणे असे अनेक गुन्हे आहेत. संबंधित आरोपीला त्वरित पकडून अटक करण्यात यावीत व त्याचा कायमचा बंदोबस्त करावा अशी तरुण युवक वर्गातून मागणी होत आहे, वडगाव ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंदविण्यात आला असून वडगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.
