
खानापूर : शिवाजीनगर खानापूर येथील रहिवासी पांडुरंग गोविंदराव पाटील (81) यांचे आज दुपारी तीनच्या सुमारास अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, आठ भाऊ, बहीण, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते खानापूर दिवाणी न्यायालयातून स्टेनोग्राफर म्हणून निवृत्त झाले होते. येथील डॉ. सुनील पाटील यांचे ते वडील होत. ते शिवाजीनगर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे सदस्य होते. अंत्यविधी आज रात्री नऊ वाजता मोक्षधाम स्मशानभूमी येथे होणार आहे.
