
उत्तर प्रदेशातील अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या राम मंदिरावर दहशतवाद्यांचा डोळा आहे. गजवा-ए-हिंद या नियतकालिकाच्या ताज्या अंकात आंतरराष्ट्रीय जिहादी गटानं शपथ घेऊन सांगितलंय की, ‘अल कायदा राम मंदिर पाडून त्या जागी मशीद बांधेल.’
याशिवाय, जिहादी फीडनं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात गरळ ओखायला सुरुवात केलीये. यासोबतच भारतीय मुस्लिमांना जिहादला पाठिंबा देण्याचं आवाहन करण्यात आलंय.
मीडिया रिपोर्ट्सनुसार 110 पानांच्या अंकात म्हटलंय की, ‘ज्या प्रकारे बाबरी मशिदीच्या रचनेवर राम मंदिर बांधलं जात आहे, ते पाडलं जाईल आणि मूर्तींऐवजी अल्लाहच्या नावावर पुन्हा बाबरी मशीद बांधण्यात येईल. मासिकातील हा मजकूर भारतीय वातावरणाशी परिचित असलेल्या व्यक्तीनं लिहिलेला दिसतोय.
मुस्लिमांनी हानीला घाबरू नये – अल कायदा……
अल कायदानं (Al Qaeda) भारतीय मुस्लिमांना उद्देशून म्हटलंय की, मुस्लिमांनी कोणत्याही भौतिक नुकसानास घाबरू नये. विष पसरवणाऱ्या दहशतवादी संघटनेनं भारतीय मुस्लिमांसाठी धर्मनिरपेक्षतेचं वर्णन ‘नरक’ केलंय, तर हिंदू-मुस्लिम बंधुत्वाचे नारे फक्त फसवणुकीसाठी आहेत, असं म्हटलंय. बाबरी मशीद 30 वर्षांपूर्वी पाडण्यात आली होती. तर, 20 वर्षांपूर्वी गुजरातमधील अहमदाबादमध्ये गर्भवती महिलांसह त्यांच्या मुलांचा शिरच्छेद करून त्यांना जाळण्यात आलं आणि आज सर्वत्र बुलडोझर चालवत आहेत. सर्व हिंदूंना लाठी वापरण्यास शिकवलं जात आहे, असंही अल कायदानं नमूद केलंय.
