
डीवायईएस स्पोर्ट्स हॉस्टेल बेळगावच्या चार ज्युडो खेळाडूंची मध्यप्रदेश येथे येत्या 30 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2023 या कालावधीत होणाऱ्या 5 व्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी अभिनंदनीय निवड झाली आहे. आगामी 5 व्या खेलो इंडिया युथ गेम्ससाठी कर्नाटक संघात निवड झालेल्या बेळगावच्या ज्युडो खेळाडूंमध्ये साई पाटील (50 किलो वजनी गट), प्रकाश यंतीत (55 किलो गट), ऐश्वर्या बी. (44 किलो गट) आणि भूमिका व्हीएन (63 किलोवरील गट) यांचा समावेश आहे. या सर्वांना बेळगाव जिल्हा क्रीडांगण येथे ज्युडो प्रशिक्षक रोहिणी पाटील आणि कुतुजा मुलतानी यांचे मार्गदर्शन लाभत आहे. उपरोक्त निवडीबद्दल चारही ज्युडो खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
