
खानापूर रेल्वे स्थानकाच्या बाजूने गेलेला रेल्वे खात्याच्या अखत्यारीत असलेला खानापूर–असोगा रस्ता अत्यंत खराब झाला असल्याने या भागातील असोगा, मन्सापूर, भोसगाळी, व ईतर गावातील नागरीकांना याचा भयंकर त्रास होत होता ऊसाच्या गाड्या सोडा ईतर लहान गाड्या सुध्दा चालवणे कठीण जात होते


शेवटी या भागातील नागरीकांनी भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या कानावर हि गोष्ट घातली असता काल बुधवार दि 19 ऑक्टोंबर रोजी या भागातील नागरिकांसह प्रमोद कोचेरी व तालुका अध्यक्ष संजय कुबल यांनी रस्त्याची पहाणी केली व त्या ठीकाणची दयनीय परीस्थिती बघून प्रमोद कोचेरी यांनी ताबडतोब रेल्वे हुबळी डिव्हीजनचे अभियंता श्रीधर यांना फोन लावला व चांगलीच कान उघाडणी केली व ताबडतोब रस्त्याची दुरूस्ती करा अन्यथा तुमच्या विरोधात वरती कळवुन तुमच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला असता

आज गुरूवार दि 20 ऑक्टोंबर रोजी हुबळी डिव्हीजनचे अभियंता श्रीधर ताबडतोब खानापूरला हजर झाले व जेसीबी च्या सहाय्याने ताबडतोब रस्ता करून त्याच्यावर खडी सुध्दा पसरून दिली त्यामुळे या भागातील नागरीकांनी प्रमोद कोचेरी यांना धन्यवाद दिले आहे
