
बेळगाव जिल्हा पोलिसांनी २०१ प्रकरणांचा तपास करून ३२४ गुन्हेगारांना अटक करून हस्तगत केलेला साडे 17 कोटीहून अधिक किमतीच्या वस्तू तक्रारदारांना परत केल्या.जप्त केलेल्या वस्तु पोलीस परेड ग्राऊंडवर जनतेला पाहण्यासाठी मांडण्यात आल्या होत्या.

बेळगाव जिल्हा पोलिसांच्या तर्फे शुक्रवारी प्रॉपर्टी रिटर्न परेडचे आयोजन केले होते.याप्रसंगी उत्तर विभागाचे आय जी पी सतिशकुमार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.यावेळी जिल्हा पोलिस प्रमुख डॉ.संजीव पाटील यांनी गुन्ह्यांचा तपास लावल्याबद्दल पोलिसांचे अभिनंदन केले.
सोन्याचे आठ किलो तीनशे सत्तर ग्रॅम दागिने,चांदीच्या सात किलोच्या वस्तू,२५० मोटारसायकल,चोवीस कार मोबाईल आणि अन्य वस्तू १२० आणि सात कोटी सत्तेचाळीस लाख रु रोख पोलिसांनी गुन्हेगारांच्या कडून हस्तगत केले होते.अथणी,बैलहोंगल,चिकोडी,गोकाक आणि रामदुर्ग उप विभागातील पोलीस स्थानकातील गुन्ह्यांचा तपास करून पोलिसांनी मुद्देमाल हस्तगत केला होता.तक्रारदारांना त्यांच्या वस्तू परत करण्यात आल्या.या कार्यक्रमात गुन्हांच्या तपासात उत्तम कामगिरी बजावलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना गौरविण्यात आले.
