
खानापूर तालुक्यातील जांबोटी भागात अति दुर्गम भागात असलेल्या चापोली गावात गंगाराम शेळके या वृद्ध इसमावर जंगली डुकराने हल्ला केल्याने ते गंभीर जखमी झाले असून ग्रामस्थांनी त्यांना सरकारी दवाखान्यात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत

याबाबत मिळालेली माहिती अशी की गंगाराम शेळके हे वृद्ध ईसम आपल्या गावातील आंबे शेताकडे चालत जात असताना पिल्ले असलेल्या डुक्कराने पाठीमागून त्यांच्यावर हल्ला केल्याने जांगेमध्ये खोल जखम झाली असून त्यांच्या डोक्याला सुद्धा मार बसल्याचे समजते.
