
भोपाळ : रस्ते अपघात गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात वाढले असून त्यातच जर शाळेच्या बसला अपघात झाला तर अनेक कुटुंबावर दुःखाचा डोंगर पसरला जातो. अशीच एक भयानक घटना भोपाळ मध्ये घडली. एकाच वेळी या ठिकाणी चार कुटुंबातील चिमुरड्यांना आपला जीव गमवावा लागला.त्यामुळे चार कुटुंबात शोककळा पसरली आहे. ही घटना मध्यप्रदेशातील उज्जैन जिल्ह्यात घडली. आई ने आपल्या चिमुरड्यांना तयार करून शाळेत पाठवले होते. लहान मुलांना शाळेच्या बसमध्ये बसवले होती. आईला बाय करून सर्व मुले बस मधून शाळेच्या दिशेने जात होते. मुले शाळेला गेली परंतु सायंकाळी येताना त्यांचे मृतदेह च दरात आले.
शाळेची बस आणि ट्रक यामध्ये अपघात होऊन चार मुलांना आपला जीव गमवावा लागला होता. या अपघात मध्ये अकरा मुले जखमी झाले होते. ट्रक आणि बस चालक हे दोघेही निष्काळजी पणाने गाडी चालवत होते. दोन्ही वाहने यांची गती ही जास्त होती. या घटनेच्या मिळालेल्या माहितीनुसार शाळेची बस ही उज्जैन नगदा या रस्त्यावरून जात असताना ट्रक ला अपघात झाला. या बसमध्ये शाळेचे एकूण १५ विद्यार्थी होते. फातिमा कॉन्व्हेन्ट शाळा आणि यशोदिप विद्यालय या शाळेचे विद्यार्थी या बसमध्ये होते. शाळेची बस ही समोरून येणाऱ्या ट्रक ला जोरात धडकली . या धडकेत चालकासोबत सर्व विद्यार्थी जखमी झाले.
अपघात झाल्यावर तेथील नागरिकांनी बसमधून ताबडतोब जखमी १५ मुलांना बाहेर काढले आणि हॉस्पिटल मध्ये दाखल केले. या १५ मुलांपैकी चार मुले उपचार घेत असताना मरण पावली. तर अकरा मुले अजूनही उपचार घेत आहेत. या गंभीर जखमी झालेल्या मुलांना इंदोर मधील हॉस्पिटल मध्ये उपचार चालू आहेत. या बसचा चालक देखील जखमी झालेला आहे. या घटनेमुळे बस मधील मुलांच्या कुटुंबात शोककळा पसरली आहे.तर परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली.
