
खानापूर : ( प्रतिनीधी – पींटू नावलकर) ओलमनी ता खानापूर येथे गेल्या सात दिवसापासून सुरू असलेल्या अखंड पांडुरंग नाम सप्ताहाची सांगता आज महाप्रसादाने करण्यात आली,
प्रती वर्षाप्रमाने या वर्षी सुध्दा सात दिवस अखंड पांडुरंग नाम सप्ताह उत्साहात साजरा करण्यात आला, दररोज भजन, कीर्तनाचा लाभ लोकांनी घेतला, ओलमनी गावचा सप्ताह तालुक्यात प्रसिद्ध असून यानीमीताने ग्रामस्थांची एकी पहाण्यासारखी असते,
आज शेवटचा दिवस असल्याने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते, महाप्रसादासाठी पाहुणे मंडळी, व आजुबाजूच्या गावातील नागरीकांचा महापूर लोटला होता, सप्ताह व्यवस्थीत पार पाडल्याबद्यल गावचे प्रमुख व्यक्ती पी एल डी बँकेचे माजी चेअरमन विश्वनाथ डीचोलकर, जोतीबा खाडे, मारूती सखाराम साबळे यांनी ग्रामस्थांचे व युवा वर्गाचे आभार मानले आहे,
