
रूमेवाडी येथे समुह संपन्मूल केंद्र होनकल अंतर्गत ‘अध्ययन महोत्सव’ अर्थात ‘कलिका हब्ब’ कार्यक्रमास सुरुवात कर्नाटक सरकारच्या वतीने कोरोनाच्या काळात मुलांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी अध्ययन पूर्णप्राप्ती योजना लागू करण्यात आली आहे. दिनांक 19-01-2023 ते 20-01-2023 या कालावधीत सरकारी मराठी प्राथमिक शाळा रुमेवाडी येथे समूह संपन्मूल केंद्र होनकल अंतर्गत 16 शाळांमधील निवडक 120 मुलांसाठी अध्ययन पूर्णप्राप्ती समाजासमोर उलगडण्यासाठी अध्ययन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचे उद्घाटन शिक्षण संयोजक श्रीमती क्रांती पाटील , नोडल अधिकारी श्री एम एन उत्तुरकर आणि शाळा एस.डी.एम.सी अध्यक्ष श्री. मारुती शिंदे, यांनी केले. कार्यक्रमात ग्रामपंचायत सदस्य श्री. विलास ना. बेडरे , महेश हल्याळकर, महेश घाडी, सुनंदा इरगार, CVPI चे अधिकारी एस.एन.देशपांडे, महेश बी.आर, मराठा मंडळचे प्राचार्य श्री अनिल कदम सर, करंबळ ग्रा.पं.कार्यदर्शी श्री मारूती पाटील,मणतुर्गा गावचे अध्यक्ष श्री प्रल्हाद मादार ,एस.डी.एम.सी.कमिटी सदस्य श्री गणेश हल्याळकर, श्री जोतिबा ना बेडरे,सौ. रेणूका बेडरे, सौ लक्ष्मी गुंडपीकर, शिक्षणप्रेमी सौ वनिता चौगुले,सौ आनंदी हल्याळकर,पालक वर्ग,नागरिक उपस्थित होते

या दोन दिवसीय कार्यक्रमात मुलांना गाऊया खेळूया, करूया खेळूया,गाव समजून घेऊया आणि कागदी कात्री वापर करून टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचे कौशल्य इत्यादि विषयांवर मार्गदर्शन करण्यात येत आहे. 'गाव समजून घेऊया या विषयावर सर्व 120 मुलांना येथील सेंट्रल व्हिलेज पॉटरी इन्स्टिट्यूट खानापूरच्या मातकाम केंद्रात नेण्यात आले.

CVPI शिक्षक श्री. व्यंकटेश कुंभार यांनी मातीपासून विविध प्रकारच्या वस्तू बनविण्याचे प्रात्येक्षिक दिले.
या प्रसंगी बेळगाव जिल्ह्याचे डी.डी.पी.आय श्री. नलवतवाडकर सर आणि DYPC श्री. मिलनट्टी यांची मुलानी मुलाखत घेऊन त्यांचे कौतुक केले. नोडल अधिकारी श्री.उत्तुरकर एस.एन.कम्मार BIRT ,श्रीमती. नयन हदगल CRP ,मुख्याध्यापक श्री एस डी पाटील, केंद्रातील सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक श्री. जोतिबा घाडी यांनी व आभारप्रदर्शन श्री हणमंत करंबळकर यांनी केले.
